महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातफेर् घेण्यात आलेल्या दहावीच्या शालांत परीक्षेच्या निकालाची तारीख अखेर जाहीर झाली असून १७ जूनला मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर सकाळी ११ वाजता हा 'ऑनलाइन' निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना मार्कलिस्टचे प्रिन्टआऊटही घेता येणार आहे. सरकारच्या 'बेस्ट फाइव्ह' निर्णयानुसार निकालात सहाही विषयांचे मार्क नमूद असतील, मात्र टक्केवारी दाखवताना जास्त मार्क मिळालेल्या पाच विषयांतील टक्के दर्शवले जाणार आहेत.


अकरावी प्रवेशातील समानीकरणासाठी 'बेस्ट फाइव्ह'चा पर्याय आजमवण्याचे यंदा सरकारने ठरवले आहे. मात्र, यासंदर्भात सुरू असलेल्या खटल्यात हायकोर्टाने प्रवेशप्रक्रियेला स्थगिती दिल्याने १८ जूनच्या कोर्ट सुनावणीनंतरच प्रवेशाचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.

निकाल बघा...

www.msbhse.ac.in, sscresult.mkcl.org, www.rediff.com, www.studyssconline.com, www.maharesult.nic.in

या वेबसाइटवर.

मोबाईलवर MHSSC आणि पुढे आपला क्रमांक टाइप करून ५७७६६ ला मेसेज पाठवा.



Ramkrishan M. Ghadigaonkar

www.ramkrishan.com.co.in

www.prematme.com.co.in


This entry was posted on 12:15 PM and is filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.